Skip to content
- वीज कंपनीत कायम स्वरूपी सेवेत असलेल्या कुठल्याही व्यक्तीस रुपये ५०० सभासद फी व रुपये १५० प्रवेश फी भरून संस्थेचे सभासद होता येईल.
- सदर रक्कम संपूर्ण सेवा काळात एकदाच भरावी लागेल.
- संस्थेचा सभासद झाल्यानंतर कामगाराचा नोकरीत असताना मृत्यू झाल्यास त्याने नेमलेल्या वारसदाराला संस्थेने वेळोवेळी ठरविलेल्या रकमेची एकदाच मदत दिली जाईल.
- सध्या (ऑक्टोबर २०२२ पासून) हि मदत रुपये १५ ०००/- इतकी देण्यात येते.
- दि.१०.सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार स्वर्गीय बाळासाहेब साठ्ये व अण्णाजी अकोटकर यांचे जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दि.१.१०.२३ नंतर मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना सदर रक्कम रु.२००००/- प्रमाणे देण्याचे जाहीर केले आहे .
- सदर मदत मिळणेकरिता वारासदारास अर्ज, मूळ पावती, प्रमाणपत्र, सभासदाचा मृत्यूचा दाखला संस्थेत सादर करावा लागेल.
- वीज कंपनीतून ज्या दिवशी सभासद सेवानिवृत्त होईल किंवा राजीनामा दिला अथवा बडतर्फ किंवा कोणत्याही कारणास्तव वीज कंपनीतून ज्या दिवशी त्याची सेवा समाप्त होईल त्या दिवशीच त्याचे सभासदत्व समाप्त होईल.
- त्यावेळी त्याने संस्थेकडे अर्ज, मूळ पावती, प्रमाणपत्र व सेवा समाप्तीची कागदपत्र सादर केल्यावर रुपये ५०० परत केले जातील.
₹ 1,00,00,000+
मदत निधी वाटप
₹ 8,00,000+
समाजकार्यात मदत